शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूक; मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 18:04 IST

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काऊंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली.

ठळक मुद्देसात जागांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काऊंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंगमतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली.

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काऊंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली.जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत सात उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सात जागांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सात जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, पसंतीक्रम नोंदवून मतदारांनी मतदान केले. अकोल्यातील तीन केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मनपा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मतत्रिकेवरील अनुक्रमांक आणि मतदारांना देण्यात येणाºया ‘काऊंटर स्लीप’वरील अनुक्रम एकच टाकण्यात आले असून,मतदानासाठी मतदान कक्षात एक-एक मतदारांना न सोडता एकत्रच सोडण्यात येत आहे. त्यामुळे मतदाराने (सदस्याने) कोणाला मतदान केले, हे माहित होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत, शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी फेरमतदानाची मागणी केली. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार गोपीकिशन बाजोरिया , माजी आमदार तथा काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मतदान केंद्राला भेट देवून, यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली.मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. मतदान प्रक्रिया नियमानुसारच घेण्यात येत आहे, तथापी गोपनीयतेचा भंग होणार नाही, यासाठी मतपत्रिकेवर अनुक्रमांकाच्या ठिकाणी स्टीकर लावण्यात येणार असून,निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. यावेळी मनपातील शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, काँग्रेसचे गटनेते साजीद खान पठाण,भारिप-बमसं गटनेत्या अ‍ॅड.धनश्री देव, नगरसेवक मंगेश काळे, शाहीन अंजुम महेबुब खान, पराग कांबळे व इतर नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केले.

 

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAkola cityअकोला शहरElectionनिवडणूक