शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

अकोला जिल्हा; बाळ दगावल्याप्रकरणाची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी; ‘कारणे दाखवा’ बजावणार

By atul.jaiswal | Updated: December 21, 2017 12:24 IST

अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत बुधवारी घटनेची चौकशी केली.

ठळक मुद्देमळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत बुधवारी घटनेची चौकशी केली.

अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी घटनेची चौकशी केली. दरम्यान, चौकशी अहवाल तयार झाला असून, संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) या बालकाला मंगळवारी सकाळी त्याच्या आई - वडिलांनी साडेआठ वाजताच्या सुमारास मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले; मात्र त्यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांपैक एकही उपस्थित नव्हता. त्यामुळे नजीकच असणाºया आयुर्वेदिक दवाखान्यातील महिला डॉक्टर सुनयना यांना पाचारण करण्यात आले; मात्र, त्यादेखील उशिराने पोहोचल्या. त्या पोहोचेपर्यंत बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. संबंधित महिला डॉक्टरने बालकाची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनमुळे आरोग्य सेवेचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी चौकशी करण्याचा आदेश मंगळवारी रात्री दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी पातूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार, डॉ. विजय जाधव यांनी मळसूर आरोग्य केंद्रात जाऊन संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले व तसा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाºयांना पाठविला. दरम्यान, मळसूर आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मळसूर येथील घटनेची चौकशी तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत करण्यात आली आहे. सदर बालकाच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.- डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणHealthआरोग्य