शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अकोला जिल्ह्यात कोसळधार; अकोला व बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

By atul.jaiswal | Updated: July 8, 2024 14:03 IST

अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांमध्ये ९० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

अकोला : गत अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून अकोला जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरु राहिल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांमध्ये ९० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाची रिपरिप मध्यरात्रीपर्यंत सुरुच होती. सोमवारी पहाटे पुन्हा पावसाने जाेर पकडला. उजाडल्यानंतर पावसाचा वेग वाढला. परिणामी शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मोठी उमरी, जवाहर नगर, डाबकी रोड, कौलखेड, शिवणी, शिवर, गीता नगर, गंगा नगर, एमरॉल्ड कॉलनी, जुने शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही भागात नागरिकांमध्ये रस्त्यावरील पाणी  शिरले. मोर्णा नदीलाही मोठा पूर आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरातही पाणी साचल्याने रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागला. 

अतिवृष्टी नोंद झालेले तालुके  बाळापुर- ९०.०८ मिमी, अकोला- ९० मिमी

अतिवृष्‍टी झालेले महसुल मंडळ (आकडे मिलीमिटरमध्ये)चोहोट्टा बाजार - १०६,  बाळापुर- ११६.८ , पारस- १११.५ ,व्‍याळा-६६.८ ,वाडेगांव - ६६.८ ,उरळ - १००.८, हातरुण-७९.८ , अकोला- ११०.०, दहीहांडा- ८५.० ,कापशी- १००.३ ,उगवा- ६९.५, आगर- ६९.८ ,शिवण- १६३.०, कौलखेड-१४६.०, राजंदा - ११६.५

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस