शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची कामे निम्म्यावरच ; केवळ ५४० कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:48 IST

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत.

ठळक मुद्दे५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली.उर्वरित ५४४ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे निम्म्यावरच थांबल्याचे वास्तव समोर आले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, अकोला  जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ५४४ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत. पावसाळा सुरू झाल्याने, उर्वरित पाणीटंचाई निवारणाची कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कृती आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची जिल्ह्यातील कामे निम्म्यावरच थांबल्याचे चित्र आहे.५८७ कामांना प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ५८७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ४७ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय