शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

स्काऊट गाइड युनिट नोंदणीत अकोला जिल्हा राज्यात प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 10:32 IST

scout and guide अकोला जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा युनिटच्या संख्येत ३०८ युनिटची वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे‘शाळा तिथे स्काऊट गाइड’ अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये ८५३ युनिटची स्थापना.गतवर्षी जिल्ह्यात एकूण ५४४ युनिटची नोंदणी झाली होती.

अकोला : शैक्षणिक सत्र २०-२१ करिता करण्यात आलेल्या स्काऊट गाइड युनिट नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, आतापर्यंत जिल्ह्यात ८५२ युनिटची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये स्काऊटच्या ३३१, गाइडच्या १८८, कबच्या १७५, बुलबुलच्या १५७ व रोव्हरच्या एका युनिटचा समावेश आहे. युनिट नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही अकोला जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा युनिटच्या संख्येत ३०८ युनिटची वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात एकूण ५४४ युनिटची नोंदणी झाली होती.

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी स्काऊट गाइड, कब बुलबुल युनिटची नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. वैशाली ठग यांनी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांच्या ऑनलाइन सभेत केले होते. त्यांच्या संकल्पनेतून ‘शाळा तिथे स्काऊट गाइड, कब बुलबुल युनिट’ स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात दि. २१ ते २९ जानेवारी कालावधीत तालुकानिहाय युनिट नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. तालुकास्तरीय युनिट नोंदणी अभियानामध्ये जिल्हा परिषदेच्या ४७९ शाळांमध्ये प्रथमच सर्वाधिक नोंदणी करण्यात आली, हे विशेष.             युनिट नोंदणी अभियानाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक देवेंद्र अवचार, अकोला जिल्ह्यातील विविध पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, श्याम राऊत, गौतम बडवे, संजय मोरे, दिनेश दुतंडे, हाडोळे, अनिल अकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी अजयकुमार बांडी, दीपमाला भटकर, गजानन सावरकर, समाधान जाधव, जिल्हा संघटक सोनिया सिरसाट, लीडर ट्रेनर डॉ. वसंतराव काळे यांच्यासह अकोला जिल्ह्यातील विविध केंद्रांच्या केंद्रप्रमुखांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. युनिट नोंदणी अभियानात तालुका प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण डांबलकर लीडर ट्रेनर, शरदचंद्र मेहेकरे लीडर ट्रेनर, के.टी. मानखैर, पी.जे. राठोड, राजेश पातळे, सुषमा देशमुख, दत्तात्रय सोनोने, संदीप वाघडकर, मनोज बगले, विजय जितकर, बबलू तायडे, डॉ. राजेश्वर बुंदेले, मेघा निबंधे, नामदेव जाधव आदींनी जबाबदारी पार पाडली. कार्यालयीन कर्मचारी रमेश चव्हाण व सुबोध शेगावकर यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र