लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १0.२ अंश नोंद केली.मागील पंधरवड्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात २0 अंशापर्यंत वाढ झाली होती. मागील पाच सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीत वाढ झाली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २७ नोव्हेंबर रोजी ९.६ किमान तापमानाची नोंद केली होती. दरम्यान, तापमान घटल्याने पुन्हा एकदा नागरिकांनी गरम कपडे खरेदी करण्यासाठीची गर्दी केली असून, रात्री व पहाटे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. ही थंडी सध्यातरी हरभरा,गहू पिकास पोषक मानली जात आहे.
अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली हुडहुडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:06 IST
अकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १0.२ अंश नोंद केली.
अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली हुडहुडी!
ठळक मुद्देअकोला १२.२ अंश डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नोंदविले १0.२ अंश