शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अकोला जिल्ह्यातील विकास कामे, समस्यांचा मुख्यमंत्री आज घेणार आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:17 IST

अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत.

ठळक मुद्देनागपूरच्या विधान भवनात दुपारी ३ वाजता होणार आढावा बैठकआढावा बैठकीसाठी अकोला जिल्हाधिकारी नागपूरला रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित अधिकारी सोमवारी सायंकाळी नागपूरकडे रवाना झाले. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची अंमलबजावणी, विकास कामांची सद्यस्थिती आणि विविध समस्या व अडचणींच्या मुद्यांवर मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील विकास कामे, योजनांची अंमलबजावणी आणि समस्यांबाबत आढावा बैठक १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री घेणार आहेत. या बैठकीला  जिल्ह्यातील आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकार्‍यांसह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व संबंधित अधिकारी सोमवारी सायंकाळी नागपूरकडे रवाना झाले आहेत.

 

मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ मुद्यांचा घेण्यात येणार आढावा! विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात गतवर्षी घेण्यात आलेल्या  आढावा बैठकीतील निर्णयाच्या इतवृत्तांची अंमलबजावणी, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत कामांचे उद्दिष्ट व साध्य, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील विकास कामांची सद्यस्थिती, कर्जमाफी योजनेंतर्गत कामाची प्रत्यक्ष स्थिती, महामार्ग रस्त्यांची स्थिती व  दुरुस्ती आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची स्थिती व दुरुस्तीची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामांची सद्यस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपांसाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करणे, शेतकरी आत्महत्या प्रकरणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कामांची सद्यस्थिती, विशेष प्रकल्पांतर्गत कामे इत्यादी मुद्यांसह विविध समस्या आणि अडचणींचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण