शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ८८ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:23 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी  १८ डिसेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकाबाकीदार ८८ हजार ८१८ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी  १८ डिसेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकाबाकीदार ८८ हजार ८१८ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आले.शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत १५ दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र एकूण शेतकर्‍यांपैकी १८ डिसेंबरपर्यंत जिल्हय़ात ८८ हजार ८१८ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, शेतकर्‍यांचे कर्जखाते ‘नील’ करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे.

एक लाखावर शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच! कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये कर्जमाफीस पात्र १ लाख ९१ हजार १८७ शेतकर्‍यांपैकी जिल्ह्यात ८८ हजार ८१८ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला, तरी उर्वरित १ लाख २ हजार ३६९ शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षाच आहे. 

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ८८ हजार ८१८ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करून, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी