शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

अकोला जिल्ह्यातील पिके उदध्वस्त!

By admin | Updated: March 3, 2015 01:15 IST

अवकाळी पावसाचा फटका, १ मार्चपर्यंत २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

राजरत्न सिरसाट/अकोला : शनिवारपासून विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. २८ ते १ मार्चपर्यंत गारपीट आणि वादळी वार्‍यांसह आलेल्या पावसाने या पाच जिल्हय़ात २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक एन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयात सर्वाधिक १७,४४६ हेक्टरवरील गहू, हरभरा, फळे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, अमरावती जिल्हय़ात ७ हजार तर अकोला जिल्हय़ात १,८३0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.यामध्ये १३,२00 हेक्टर हरभर्‍याचे क्षेत्र असून, गव्हाचे क्षेत्र १२,६00 आहे. १८१ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. २0८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.