शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभार समाजाने दिले धरणे

By atul.jaiswal | Updated: December 15, 2017 15:58 IST

अकोला : गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाने दिल्यानंतरही त्या मान्य न झाल्यामुळे शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने महासंघांच्या आदेशाप्रमाणे अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शाखीय कुंभार समाजाने धरणे दिले.

ठळक मुद्देविविध मागण्या त्वरीत मान्य करण्यासाठी दिले निवेदनदेवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये दिले होते आश्वासन

अकोला : गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाने दिल्यानंतरही त्या मान्य न झाल्यामुळे शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने महासंघांच्या आदेशाप्रमाणे अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शाखीय कुंभार समाजाने धरणे दिले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर कुंभार समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. समाजाच्या या स्थितीकडे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने २० जानेवारी २०१४ रोजी वर्धा येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुुंभार समाजाच्या मागण्या सत्तेत आल्यानंतर ६ महिन्यांमध्ये सोडविण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे समाजात असंतोष उफाळला आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार हरीदास भदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांच्यासह सर्व शाखीय कुंभार समाजाचे संजय वाडकर, मनोज बनचरे, अविनाश खोपे, मनीष घाटोळे, प्रदीप मांगुळकर, संतोष सरोदे, अशोक आगरकर, अ‍ॅड. अरुण सौदागर व कुंभार समाज संघटनेचे पदाधिकारी व कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आहेत मागण्याकुंभार समाजाच्या उन्नतीसाठी इतर राज्याप्रमाणे स्वतंत्र माती कला बोर्ड स्थापन करावे.त्यातून समाजाला आर्थिक, सांस्कृतिक, पारंपरिक स्वावलंबी करावे, समाजाचा भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात समावेश करावा.वीट, मटकी, मूर्ती व्यवसायासाठी अस्तित्वात असलेल्या कुंभारखाणी समाजाला द्याव्या.समाजाला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्यावे.व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्याव्या.संत गोरोबा काका यांचे जन्मगाव तेर येथे विकास आराखडा तयार करून तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा द्यावा.मातीवरील रॉयल्टी माफ करावी.समाजातील निवृत्त कामगारांना मासिक ३ हजार रुपये मानधन द्यावे.एमआयडीसीमध्ये अग्रक्रमाने जागा द्यावी.वीज केद्रांतील राख प्राधान्याने द्यावी.

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयagitationआंदोलन