लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ वाजे दरम्यान जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागा त मोटारसायलने फिरुन तेथील समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे हे देखील होते. त्यांनी महानगर पालिका क्षेत्रातील गौरक्षण रोड, कपीलवस्तू नगर, आजाद कॉलोनी व मलका पुरच्या काही भागाची पाहणी करुन तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या पाहणीदम्यान त्यांना अनेक ठिकाणी पथदीवे, नाल्या सफाई, परिसरातील स्वच्छता आणि नवीन नाल्या बांधाणीची कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. ही कामे काम तातडीने करण्याच्या त्यांनी संबंधीत विभागांना सुचना दिल्या आहेत. यावेळी दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी व परिसरातील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
अकोला जिल्हाधिकार्यांनी मोटारसायकलवर फिरुन जाणून घेतल्या शहरातील समस्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:35 IST
अकोला: गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ वाजे दरम्यान जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागा त मोटारसायलने फिरुन तेथील समस्या जाणून घेतल्या.
अकोला जिल्हाधिकार्यांनी मोटारसायकलवर फिरुन जाणून घेतल्या शहरातील समस्या!
ठळक मुद्देगौरक्षण रोड, कपीलवस्तू नगर, आजाद कॉलोनी व मलकापुरच्या काही भागाची केली पाहणी पाहणी करताना नागरिकांशी साधला संवाद