शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीविना तूर, हरभरा घरात; ५२ हजार शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:40 IST

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर, हरभरा खरेदीविना अद्याप पडून असल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे.

ठळक मुद्दे१५ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आली तसेच २९ मे पासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकºयांची तूर आणि २० हजार शेतकºयांचा हरभरा खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार १४६ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदीविना अद्याप घरात पडून आहे.

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर, हरभरा खरेदीविना अद्याप पडून असल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे. खरीप पेरणी तोंडावर आली असताना, तूर व हरभरा खरेदीचा प्रश्न कायम असल्याने, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, पारस, वाडेगाव व पिंजर या सात केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली तर हरभरा खरेदीसाठी २३ हजार शेतकºयांनी नोंदणी केली. खरेदीची मुदत संपल्याने, गत १५ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आली तसेच २९ मे पासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जिल्ह्यातील गोदामात जागा उपलब्ध नसल्याने, खरेदीच्या सुरुवातीपासूनच तूर व हरभरा खरेदी संथगतीने करण्यात आली. त्यामुळे खरेदी बंद होईपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी केवळ १३ हजार ८०९ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली असून, ३ हजार शेतकºयांचा हरभरा खरेदी करण्यात आला. नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकºयांची तूर आणि २० हजार शेतकºयांचा हरभरा खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार १४६ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदीविना अद्याप घरात पडून आहे. खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना तूर व हरभºयाची खरेदी अद्याप बाकी असल्याच्या स्थितीत खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च कसा भागविणार, असा पेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.चुकारेही प्रलंबित !नाफेड मार्फत तूर व हरभरा खरेदीत गत २ मार्चपासून जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या तूर व हरभºयाचे चुकारेही अद्याप करण्यात आले नाही. तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले तूर, हरभरा खरेदीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी