शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:33 IST

तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले.

अकोला: जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होऊन झालेली समस्या म्हणजेच सिकलसेल हा आजार आहे. अनुवांशिक असल्याने आपल्या सतर्कतेतूनच या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे लग्नापूर्वी प्रत्येकाने सिकलसेलची तपासणी करावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो आहे.सिकलसेल हा अनुवांशिक असून, केवळ रुग्णाला पाहून किंवा नाडीची चाचणी करून त्याचे निदान करता येत नाही. रुग्णाच्या रक्ताची प्राथमिक सोल्युबिलिटी तपासणी केल्यावरच या आजाराचे निदान करणे शक्य आहे. या आजारात पीडित आणि वाहक असे दोन प्रकारचे रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात २०११ पासून ते आतापर्यंत तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले. वाहक असलेल्या रुग्णामध्ये लक्षण दिसत नाही, त्यामुळे हा समाजामध्ये सिकलसेल आजार वाढविण्याचे काम करतो; परंतु पीडित व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे सिकलसेल असलेल्या व्यक्तीने सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीसोबत विवाह करणे धोक्याचे ठरू शकते. असे झाल्यास हा आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे विशेषत: तरुणाईने वेळीच सतर्कता बाळगत सिकलसेलची तपासणी करून घ्यावी. तपासणी अहवालात वाहक किंवा पीडित असाल तर एकमेकांसोबत विवाह टाळा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.असा विवाह टाळासिकलसेल असलेल्या महिला व पुरुषांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळणे हाच त्यावरील नियंत्रणाचा योग्य उपाय आहे. म्हणून सिकलसेल वाहक आणि पीडित किंवा वाहक आणि वाहक, तसेच पीडित आणि पीडित यांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळावे.ही आहेत लक्षणे

  • रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव
  • हातपाय दुखणे
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
  • रुग्णांना दम लागणे
  • कावीळ होणे
  • रक्ताचा दोष निर्माण होणे
  • आॅक्सिजनच्या अभावामुळे तीव्र वेदना

कोणाला होतो हा आजारएका पिढीपासून दुसºया पिढीला हाणारा हा आजार प्रामुख्याने भिल्ल आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळतो. नात्यात विवाह झाल्यास आजाराचा धोका संभवतो. राज्यात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, विदर्भ या भागात आजाराचे प्रमाण जास्त आहे.सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्याने सतर्कता हाच त्यावरील योग्य उपचार आहे. प्रत्येकाने विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य