शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : जिल्हय़ातील कामांचे प्रस्ताव सादर करण्यात यंत्रणांची उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:38 IST

अकोला : जिल्हय़ातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांकरिता २६ कोटी ८५ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी गत महिन्यात मंजुरी दिली; मात्र कामांचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित यंत्रणांची उदासीनता असल्याने, जिल्हय़ात पाणीटंचाई निवारणाची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणाची कामे रखडली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांकरिता २६ कोटी ८५ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी गत महिन्यात मंजुरी दिली; मात्र कामांचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित यंत्रणांची उदासीनता असल्याने, जिल्हय़ात पाणीटंचाई निवारणाची कामे रखडली आहेत. यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात नदी-नाले कोरडे पडले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्हय़ातील विविध भागात हिवाळ्यातच पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर  जिल्हय़ातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांनी महिनाभरापूर्वी मंजुरी दिली आहे; परंतु पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट कामांसाठी जिल्हय़ातील पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व तहसीलदारांमार्फत कामांचे प्रस्ताव आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय कार्यालयांमार्फत कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले नसल्याने, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत   पाणीटंचाई निवारणाच्या कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कामांचे प्रस्ताव सादर करण्यात संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेत जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाची कामे रखडली आहेत. त्यानुषंगाने कृती आराखड्यात समाविष्ट असलेली जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीडीओ-तहसीलदारांचे प्रपत्र; अंदाजपत्रके केव्हा प्राप्त होणार ?पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यासाठी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) व तहसीलदारांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रपत्र -ब आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय कार्यालयांमार्फत कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त होणे आवश्यक आहे; परंतु जिल्हय़ातील एकाही तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी बीडीओ व तहसीलदारांचे प्रपत्र -ब आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय कार्यालयांकडून कामांची अंदाजपत्रके  जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे कामांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी बीडीओ-तहसीलदारांचे प्रपत्र -ब  कामांची अंदाजपत्रके केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकाही कामाचा   प्रस्ताव नाही!जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात १ हजार ८४ उपाययोजनांची कामे समाविष्ट असली तरी, त्यापैकी एकाही उपाययोजनेच्या कामाचा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला नाही. 

टॅग्स :WaterपाणीAkola Ruralअकोला ग्रामीण