अकोला: विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरद्वारा आयोजित विदर्भातील सर्व जिलतील शहरी व ग्रामीण विभागातील प्र ितभावंत महिला खेळाडूंचा शोध घेण्यासाठी व त्यांच्यातील गुणवत्तेला न्याय देण्यासाठी सर्व जिलमध्ये एकाच वेळी व्हीसीए निवड चाचणी घेण्यात येणार आहे. अकोला विभागात अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा संघाचा समावेश असून, अकोला विभागाची निवड चाचणी रविवार, १९ एप्रिल रोजी अकोला क्रिकेट क्लब येथे सकाळी ९ वाजता घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी सिनिअर व ज्युनिअर महिला खेळाडूंचे व्हीसीएतर्फे निवड चाचणीचे आयोजन केले आहे. चाचणीसाठी नागपूर येथून निवड समिती सदस्य येणार आहेत. चाचणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. चाचणी ही अकोला विभागात येणारे जिल्हे अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हाकरिता आहे. याकरिता अकोला जिल तील महिला खेळाडूंनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर, किशोर वाकोडे बुलडाणा, संजय गायकवाड वाशिम यांच्याशी संपर्क साधावा. निवड चाचणीकरिता महिला खेळाडूंनी संपूर्ण क्रिकेट खेळसाहित्य व पोषाखात मैदानात हजर राहणे आवश्यक आहे. १९ वर्षाखालील महिला खेळाडूचा जन्म १ सप्टेंबर १९९६ नंतरचा असावा आणि सिनिअर महिला खेळाडूचा जन्म १ सप्टेंबर १९९६ पूर्वीचा असावा. निवड झालेल्या महिला खेळाडू अकोला विभागाचे आगामी क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती व्हीसीए नागपूर जिल्हा समिती चेअरमन नितेश उपाध्याय यांनी दिली.
अकोला विभाग महिला क्रिकेट संघ निवड चाचणी
By admin | Updated: April 14, 2015 00:31 IST