शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

Akola: गुढीपाडव्याला निघाली संस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा, फलकांद्वारे मतदानाविषयी जनजागृती

By नितिन गव्हाळे | Updated: April 9, 2024 14:43 IST

Akol News: गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरूवात. यानिमित्त शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने ९ एप्रिल रोजी सकाळी जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आली.

-नितीन गव्हाळे अकोला - गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरूवात. यानिमित्त शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने ९ एप्रिल रोजी सकाळी जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करून उत्साहात स्वागत करण्यात आले.

प्रारंभी राजराजेश्वर मंदिरात लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील, आमदार रणधीर सावरकर, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी महापूजा केल्यानंतर स्वागत यात्रेला सुरूवात करण्यात आली. यात्रेत पारंपरिक वेशभूषा, केशरी फेटे घालून नागरिक सहभागी झाले होते. ही यात्रा काळा मारोती, सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, राणी सती धाम मंदिर येथून मार्गक्रमण करीत, टाॅवर चौक, रतनलाल प्लॉट चौकमार्गे सिव्हिल लाइन, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर तेथून राऊतवाडी मार्गे जठारपेठ चौक येथून मार्गक्रमण करत बिर्ला राम मंदिर येथे पोहोचली. याठिकाणी महाआरतीने स्वागत यात्रेचा समारोप झाला. रॅलीमध्ये संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ. आर बी हेडा, कार्याध्यक्ष हरिष आलिमचंदानी, स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम मालाणी, स्वागत समितीचे उपाध्यक्ष नीलेश देव, नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, महेश जोशी, मोतीसिंह मोहता, हेमेंद्र राजगुरू, इंद्राणी देशमुख, सुधाकर अंबुसकर, निनाद कुळकर्णी, चंदा जयस्वाल,आशा खोकले, चित्रा बापट, अर्चना शर्मा, निकेश गुप्ता, डॉ. माधव देशमुख, रामप्रकाश मिश्रा, विवेक देवकते, नंदकिशोर आवारे, अभय बिजवे, विनोद देव, मनीष चंदानी, अशोक पाध्ये, आनंद बांगड, समितीचे संयोजक विनोद जकाते, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, महिला संयोजिका सोनल ठक्कर,मीनाक्षी आपोतीकर, रश्मी कायन्दे, कोषाध्यक्ष शरद वाघ, प्रचार प्रमुख समीर थोडगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनसंस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा राणीसती धाम मंदिर मार्गावरून स्वागत यात्रेने न्यू राधाकिसन प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे पोहोचून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. राम दरबार विशेष आकर्षणलोकसभेची निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर समितीच्यावतीने मतदानाबाबत संदेेश देणारे विविध प्रकारचे फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या यात्रेत मर्यादा पूरुषोत्तम प्रभू श्रीराम,सीता माई,लक्ष्मण,राम भक्त हनुमान यांचा राम दरबार विशेष आकर्षण होते.

संस्कृती संवर्धनासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार एकत्रगुढीपाडव्यानिमित्त संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने राजराजेश्वर मंदिरातून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेतप्रतिस्पर्धी उमेदवार कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील, भाजपचे अनुप धोत्रे एकत्र आले होते. त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करून सोबत फोटोसुद्धा काढून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाAkolaअकोला