शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : साईबाबांच्या पादुका दर्शनासाठी भक्तांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:51 IST

अकोला : साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमन झाले असता, पादुकांच्या दर्शनासाठी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात अकोलेकरांची गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

ठळक मुद्देदर्शनासाठी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमन झाले असता, पादुकांच्या दर्शनासाठी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात अकोलेकरांची गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. साईबाबांच्या जन्म शताब्दीनिमित्त शिर्डी संस्थानच्या विश्‍वस्तांचे सोमवारी राजराजेश्‍वर नगरीत साईबाबांच्या पादुका घेऊन आगमन झाले. समितीचे सर्व सेवाधिकारी आ. गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते पादुकांचे पूजन होऊन शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्‍वर मंदिरापासून सकाळी १0 वाजता शोभायात्रा निघाली. यावेळी ठिकठिकाणी पादुकांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून अकोलेकरांनी दर्शन घेतले. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दिव्यांग, अंध व मूकबधिर विद्यार्थी, मातृशक्तीसाठी दर्शनाची वेगळी रांग लावण्यात आली होती. यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, सुहासिनीताई धोत्रे, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, समितीचे अध्यक्ष हरीश मानधने, डॉ.आर.बी. हेडा, हरीश आलिमचंदानी, ब्रिजमोहन चितलांगे, कैलास मामा अग्रवाल, समितीचे सचिव जगदीश मुंदडा, पुरुषोत्तम मालपाणी, सुमनताई गावंडे, सतीश ढगे, उषा विरक यांनी पूजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश मिश्रा, डॉ. रणजित सपकाळ, ओमप्रकाश बाजोरिया, विजय तोष्णीवाल, सुजित सिंग ठाकूर, सत्यनारायण जोशी, दिलीप खत्री, गिरीश जोशी, आशिष बाहेती, प्रदीप शर्मा, विजय जयपिल्ले, अमोल ढोरे, गोपाल खंडेलवाल, वसंत बाछुका, अशोक  गुप्ता, नाना उजवणे, ओमप्रकाश गोयंका, श्यामसुंदर खंडेलवाल, राधेश्याम भन्साळी, तरुण खत्री, अशोक  धानुका, रमेश कोठारी, डॉ. विनोद बोर्डे, अशोक शर्मा,  डॉ. अभय जैन, राजेश सरप, विजय शर्मा, शैलेश गोसावी, पवन बाहेती, संजय अग्रवाल यांच्यासह असंख्य भाविकांनी परिश्रम घेतले. 

शिर्डी येथील विश्‍वस्तांचा सत्कारसाईबाबा यांच्या पादुका आणणारे शिर्डी येथील विश्‍वस्त व मान्यवरांचा आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी यथोचित सत्कार केला. अक ोलेकरांना पादुकांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विश्‍वस्तांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

वयोवृद्ध महिलांची आरोग्य तपासणीवृद्धाश्रमातील वयोवृद्ध महिलांसाठी यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण चव्हाण व त्यांच्या चमूने मोफत आरोग्य तपासणीची व्यवस्था केली होती. यावेळी अंध विद्यालयातील विद्यार्थी शंकर बेले याने साई बाबांचे भजन गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

अंध मुलांना महाप्रसादाचे वाटपमुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पादुकांच्या दर्शनासाठी आलेल्या अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध स्त्रियांना दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती. दर्शन घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :saibabaसाईबाबाAkola cityअकोला शहर