शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खरीप तोंडावर; पीक कर्ज वाटप १४ टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:47 IST

पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

- संतोष येलकर

अकोला: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले; मात्र खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५४३ शेतकऱ्यांना १९४ कोटी ५७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.२०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत गत १ एप्रिलपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असताना, जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १५ मेपर्यंत २२ हजार ५४३ शेतकºयांना १९४ कोटी ५७ लाख रुपये (१४ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून, खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच आहे. पीक बँकांकडून संथ गतीने पीक कर्जाचे वाटप सुरु असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना १ हजार २०४ कोटी २१ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकनिहाय असे आहे पीक कर्जाचे वाटप!बँक                                                   शेतकरी                                रक्कम (कोटी)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक           १९,६९६                               १६४.७१राष्ट्रीयीकृत बँका                               २,१०२                                  २३.१५ग्रामीण बँक                                        ७४५                                      ०६.७१शेतकरी अडचणीत शेती मशागतीच्या कामांसह बियाणे व खते आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, १ लाख ५२ हजार ३०४ शेतकºयांना पीक कर्जाचा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत खरीप पेरीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज