शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचे ९४ कर्मचारी लेट लतिफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:28 IST

अकोला महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे  पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर  आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध  विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ कर्मचारी कार्यालयात हजर  नसल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देप्रभारी उपायुक्त संजय खडसे यांची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे  पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर  आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध  विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ कर्मचारी कार्यालयात हजर  नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधित ‘लेट लतिफ’ कर्मचार्‍यांना कारणे  दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची राज्य शासनाने १0 नोव्हेंबर  रोजी बदली केली. आयुक्तपदी जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेशही जारी झाला.  नगर विकास विभागाच्या अखत्यारित येणार्‍या ‘एमएमआरडीए’ने वाघ यांना अद्या पही कार्यमुक्त न केल्यामुळे ते रुजू होऊ शकले नाहीत. तेव्हापासून मनपाचे आयुक्त  पद रिक्त आहे. यात भरीस भर मुख्य लेखा परीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश  सोळसे दीर्घ रजेवर आहेत. तर तत्कालीन उपायुक्त समाधान सोळंके यांना कार्यमुक्त  केल्यामुळे त्यांचे पदही रिक्त आहे. अर्थातच, मनपाचा कारभार प्रभारींच्या  खांद्यावरून सुरू आहे.  आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकार्‍यांकडे तसेच दोन्ही उ पायुक्त पदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे सोपविण्या त आला आहे. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा स्थानिक अधिकारी व कर्मचारी घेत  असल्याचे दिसून येते. मनपात सक्षम अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने इतर  कर्मचारी निरंकुश झाले आहेत. कार्यालयात हजर न राहता परस्पर घरी निघून जात  असल्याने प्रशासकीय कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हा प्रकार ध्यानात  आल्यामुळे शुक्रवारी प्रभारी उपायुक्त संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता  विविध कार्यालयांची आकस्मिक पाहणी केली असता तब्बल ९४ कर्मचारी वेळेवर  हजर नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली आहे. 

सर्व विभागांमध्ये शुकशुकाट!प्रभारी उपायुक्त संजय खडसे यांनी सकाळी मालमत्ता कर विभाग, सामान्य प्रशासन  विभाग, जलप्रदाय विभाग, नगररचना विभाग, बाजार, परवाना विभाग, आरोग्य  विभाग, लेखा विभाग, विद्युत विभाग, अंतर्गत लेखा परीक्षक विभाग, विधी विभाग,  शिक्षण विभाग, बांधकाम विभागाची पाहणी केली असता, कर्मचार्‍यांअभावी  शुकशुकाट आढळून आला.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरMuncipal Corporationनगर पालिका