शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  महापालिकेचा चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड हडपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:40 IST

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फूटाचा शासकीय भूखंड हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देचार हजार स्क्वेअर फुटाचा तब्बल हा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून हा भूखंड नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकला असल्याचे समोर आले आहे.भूखंडाची खरेदी-विक्री झाल्याने खरेदी-विक्री व्यवहार करणारे दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. हा भूखंड लीजवर घेऊन खरेदी-विक्री केल्याचे दाखविण्यात येत असून, ही शासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे.

- सचिन राऊतअकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फूटाचा शासकीय भूखंड हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर हा एक कोटी रुपये किमतीचा भूखंड लीजवर घेतल्याचे दाखवून या भूखंडाच्या खरेदी-विक्रीचाही व्यवहार पार पाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेच्या मालकीचे आहे; मात्र असे असतानाही सदर चार हजार स्क्वेअर फुटाचा तब्बल हा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून हा भूखंड नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकला असल्याचे समोर आले आहे. या भूखंडाची खरेदी-विक्री झाल्याने खरेदी-विक्री व्यवहार करणारे दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. शासनाच्या मालकीच्या भूखंडाची खरेदी-विक्री झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील तत्कालीन अधिकारी अहिरे व कर्मचारी शिवाजी काळे यांनीही सदर भूखंड रमेशचंद्र अग्रवाल व नंतर शेख नवेद शेख इब्राहीम यांच्या नावावर नोंदविला आहे. या प्रकरणाची तक्रार भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडे झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक चौक शी केली असून, सदर भूखंड महानगरपालिकेच्या मालकीचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र हा भूखंड लीजवर घेऊन खरेदी-विक्री केल्याचे दाखविण्यात येत असून, ही शासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे संतोषी माता मंदिर परिसरातील २० कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात संशयाच्या फेºयात असलेले शिवाजी काळे यांनीच या प्रकरणातही नोंद घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास या परिसरातील आणखी शासनाचे भूखंड हडपणाºया या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.२०१२ मध्ये झाली खरेदी-विक्रीसदर भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांच्या मालकीचा दाखवून तो शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकण्यात आला आहे. २०१२ ते २०१३ या कालावधीत या भूखंडाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पार पडलेला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा