शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

अकोला : मोर्णा नदीकाठी होणार ‘सहकार घाट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:06 IST

अकोला :  ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सहकार घाटा’चे भूमिपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सहकार घाटा’चे भूमिपूजन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सहकार घाटा’चे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेनंतर नदीकाठावर लोकसहभागातून घाट बांधण्यात येणार असून, उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीच्या काठावर ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार आहे. या घाटाचे भूमिपूजन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

निधीसाठी प्रयत्न            करणार - पालकमंत्री मोर्णा स्वच्छता मिशन अभियानासंदर्भात केंद्रीय स्तरावर बैठक घेण्यात येणार असून, नमामी नदी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी दिली. साबरमती नदी स्वच्छ मिशनच्या सनदी अधिकार्‍यांसोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे पथक पाहणीसाठी लवकरच अहमदाबाद येथे पाठविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

आज स्वच्छता मोहीमजिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने लोकसहभागातून शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून गत १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम प्रारंभ करण्यात आली. त्यामध्ये चौथ्या टप्प्यातील मोर्णा स्वच्छता मोहीम ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजतापासून राबविण्यात येणार आहे.

आमदार शर्मा यांनी जाहीर केला १५ लाखांचा निधीजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी आजपयर्ंत हजारो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे नदीकाठी विविध विकास कामांसाठीही अनेक दात्यांकडून आर्थिक योगदान मिळत आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोर्णाच्या विकासासाठी रुपये १५ लाखांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून नदीकाठी घाटाची निर्मिती केली जाणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी जाहीर केलेल्या रुपये  १५ लाखांच्या निधीतून मोर्णा काठी घाट निर्मितीचे काम केले जाणार आहे.

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमSubhash Deshmukhसुभाष देशमुख