अकोला : लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष करीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आता प्रतिष्ठेचे होऊन बसले आहे. अकोला शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बगिचे, रुग्णालये आणि बाजार आदी ठिकाणी नेहमीच धूम्रपान होत असल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे, या तोर्यात लोक थुंकत असतात. याला शासकीय कार्यालयेदेखील अपवाद नाहीत. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणारे लोक तर धूम्रपान करतातच, शासकीय कर्मचारीदेखील सर्वांसमोर धूम्रपान करताना दिसून येतात. शासकीय कार्यालयांच्या भिंती तर थुंकल्यामुळे चांगल्याच रंगल्या आहेत. ज्यांनी कायद्याचे पालन करायचे तेच शासकीय कर्मचारी कायदा तोडताना दिसतात, तर मग सर्वसामान्य नागरिकांना कोण म्हणणार. शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्या चमूने सकाळपासून सार्वजनिक ठिकाणांचा आणि शहरातील शासकीय कार्यालयांचा दौरा केला. या दौर्यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे आढळून आले. शासकीय कार्यालयांमध्ये तर मोठय़ा प्रमाणात पान-गुटख्यामुळे रंगलेल्या भिंती दिसून आल्या. याबाबत अधिकार्यांना विचारले तर ह्यकाय करणार, हे तर रोजचेच आहे, कोण समजविणार, समजावून तर आम्ही थकलो आहोतह्ण अशी उत्तरे मिळाली. शेवटी शासनाच्या कायद्याचे पालन करणार कोण, हा प्रश्न कायम आहे.
अकोल्यात सार्वजनिक ठिकाणी सर्रास तंबाखू सेवन
By admin | Updated: July 19, 2014 01:32 IST