शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकोला : महापौरांच्या दालनात काँग्रेस-शिवसेनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:32 AM

अकोला : मनपा प्रशासनाच्या मदतीने सत्ताधारी भाजपाने अकोलेकरांवर लादलेल्या करवाढीच्या संदर्भात विशेष सभा आयोजित करण्याची मागणी लावून धरत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी दुपारी दोन वाजता महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन  छेडले.

ठळक मुद्देकरवाढीच्या मुद्यावर विशेष सभेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा प्रशासनाच्या मदतीने सत्ताधारी भाजपाने अकोलेकरांवर लादलेल्या करवाढीच्या संदर्भात विशेष सभा आयोजित करण्याची मागणी लावून धरत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी दुपारी दोन वाजता महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन  छेडले. रात्री साडेनऊ वाजता सिटी कोतवाली पोलिसांनी काँग्रेस-सेनेच्या नगरसेवकांना ताब्यात घेतले असता, नगरसेवकांनी मनपा कार्यालयापासून  ते सिटी कोतवालीपर्यंत पायी चालणे पसंत केले. पायी चालणारे नगरसेवक व त्यांना गराडा घालणारे पोलीस असे चित्र अकोलेकरांनी अनुभवले. मनपातील सत्ताधारी पक्ष भाजपा व प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर अकोलेकरांवर सुधारित करवाढ लागू केली. अव्वाच्या सव्वा करवाढ लागू केल्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मुद्यावर महापौर विजय अग्रवाल यांनी विशेष सभा आयोजित करण्याची मागणी लावून धरली होती. सुमारे दीड महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेता साजीद खान,  डॉ.जिशान हुसेन, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी विशेष सभा घेण्यासाठी महापौरांना नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते. आजपर्यंतही यासंदर्भात महापौरांनी भूमिका स्पष्ट न केल्यामुळे बुधवारी दुपारी दोन वाजता काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन व शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. रात्री साडेनऊ वाजता सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, इरफान खान, मोहम्मद नौशाद, फिरोज खान, नगरसेविका विभा राऊत, शाहीन अंजूम मेहबुब खान, अजरा  नसरीन मकसूद खान, नगरसेविका पती रवि शिंदे, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे,  नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले यांना महापौरांच्या दालनातून ताब्यात घेतले. 

राष्ट्रवादी, भारिपची पाठ!करवाढीमुळे सर्वसामान्य अकोलेकर होरपळला जात असल्याच्या मुद्यावर काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादी व भारिपच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन दीड महिन्यांपूर्वी विशेष सभेची मागणी केली होती. बुधवारी महापौरांच्या दालनात काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन छेडले असता, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. 

आयुक्त म्हणाले, माझ्या दालनात चला!विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नगरसेवकांची भेट घेतली. माझ्या दालनात चला, आपण चहा घेऊन सविस्तर चर्चा करू, असा प्रस्ताव आयुक्तांनी समोर केला असता, नगरसेवकांनी तेवढ्याच नम्रतेने आयुक्तांना नकार दिला. 

नगरसचिवांनी केली तक्रार पण...प्रशासनाच्यावतीने नगरसचिव बिडवे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नगरसेवकांविरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. परंतु, आमचा कोणताही गुन्हा नसताना ताब्यात घेतले कसे, असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस, सेनेच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच थांबणे पसंत केले. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन