लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या काँग्रेसचा हा मोर्चा भव्य निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मोजक्या सायकली अन् तीन बैलगाडीमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेसमधील एक गट सायकलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर दुसरा गट बैलगाडीतून दाखल झाल्याने काँग्रेसमधील गटबाजी अधोरेखीत झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पेट्रोल-डीझल दरवाढीविरोधात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते, त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
अकोला : पेट्रोल-डीझल दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल अन् बैलगाडी मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:51 IST
अकोला : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या काँग्रेसचा हा मोर्चा भव्य निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मोजक्या सायकली अन् तीन बैलगाडीमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
अकोला : पेट्रोल-डीझल दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल अन् बैलगाडी मोर्चा!
ठळक मुद्देपेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेधदोन गटांचे स्वतंत्र प्रदर्शन