शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कट्यार येथे दोन गटांत हाणामारी; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:25 IST

बोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे१७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कट्यार येथे ग्रामपंचायत सरपंच पदभार व उपसरपंच निवड होती. दरम्यान, या निवडणुकीतून वाद होऊन दोन गटांत हाणामारी झाली. श्रीकिसन बावस्कर रा. कट्यार यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातील सरपंच पदग्रहण व उपसरपंच निवडणूक झाल्यानंतर सरपंच देवीदास भारसाकडे हे बाहेर येताच जय ठाकरे याने त्यांना म्हटले की, तू या गावातून निवडून आला तुला लोकांनी कसा पाठिंबा दिला तेच पाहतो, असे बोलून काठी विटांनी जय ठाकरे, संदीप ठाकरे, राजू सोळंके, गजानन सोळंके, मंगेश डाबेराव, राजू डाबेराव, रवी ठाकरे, उमेश डाबेराव, सुभाष कडू, रामसिंग सोळंके, उत्तम सोळंके, आकाश सोळंके, आनंद डाबेराव, गजानन साबे, ज्ञानेश्‍वर साबे, झाबुराव देशमुख, प्रवीण ढोरे, यांनी संगनमत करून मारहाण केली. बावस्कर यांच्या फिर्यादीवरून १७ जणांविरुद्ध  गुन्हे दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

येवता येथे पोलिसांना मारहाणविझोरा : येथून जवळच असलेल्या येवता येथे उपसरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर विजयी रॅली काढणार्‍यांना मनाई करणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना काही युवकांनी मारहाण केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करणार्‍यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. येवता येथे २९ डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक आणि सरपंचांचा पदभार समारंभ आयोजित करण्यात आला होता. उपसरपंचपदी शिवसेनेच्या वंदना सिरसाट यांची निवड झाली. सरपंच रेणुका कुलट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातून विजयी रॅली काढली. या रॅलीनंतर उपसरपंचपदी विजयी झालेल्या सिरसाट यांच्या सर्मथकांनीही सायंकाळी गावातून विजयी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परवानगी नसल्याने रॅली काढण्यास दोन पोलीस कर्मचार्‍यांनी विरोध केला. त्यावरून ग्रामस्थ व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यातूनच काही युवकांनी या पोलिसांना मारहाण केली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना मारहाण करणार्‍या युवकांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हाgram panchayatग्राम पंचायत