शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी अकोल्यातील उद्योगांना घरघर; कुंभारी तलावात फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:29 IST

अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा तलावात आहे.  भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देलवकरच उद्योगमंत्र्यांसोबत बैठक

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा कुंभारी तलावात आहे.  भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे. नागपूरनंतर विदर्भात अकोला एमआयडीसीचे उद्योग राज्य शासनाला मोठा महसूल देतात. अकोल्यातील डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगर आदी व्यवसायाने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या उद्योगांना पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना   नसल्याने दर दोन वर्षांनंतर येथे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. यंदाही पाणी समस्येमुळे  हे उद्योग अडचणीत सापडले असून, उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन हतबल झाले आहे. अलिकडेच ‘फूड एक्स्पो’ कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री येथे आले तेव्हा उद्योजकांसोबत त्यांची बैठक झाली होती.त्या बैठकीत उद्योगमंत्र्यांनी या समस्येत जातीने लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याअनुषंगाने पुढील आठवड्यात आ. गोपीकिसन बाजोरीया तसेच संबंधीत अधिकार्‍यांची उद्योगमंत्र्यांसोबत बैठक होत असल्याची माहीती सुत्रांनी   दिली. 

एमआयडीसीची पाणी समस्या गंभीर होत असून, एमआयडीसी प्रशासनाने अजूनही याची दखल गंभीरतेने घेतलेली नाही. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या बाबींकडे एमआयडीसी प्रशासनाने वेळोवेळी लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. अजूनही तातडीची उपाययोजना हवी आहे.- कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन.

एमआयडीसीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात तातडीच्या उपाययोजनांवर निर्णय होईल.  कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी  ६४ खेडी खांबोरा प्रकल्पाच्या पाइपलाइनचा व्यास वाढवून त्यातून एमआयडीसीला पाणी  पुरवठा शक्य आहे. यामध्ये शासनाचे केवळ ६-७ कोटी जातील. या तुलनेत महान, घुंगशीतून पाणी मिळविणे ४0 कोटींच्या घरात जाईल.- आमदार गोपीकिसन बाजोरिया, अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळWaterपाणी