शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : गुंगीचे औषध फवारून १.३० लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:11 IST

नझीर मोहम्मद खान यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारून सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देअज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या अंगावर गुंगी आणणारे औषधाचा फवारा केला. २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, ३० हजारांचे सोने, तसेच नगदी ८० हजार रुपये, असा एकूण सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युसूफ अली चौकात रहिवासी असलेल्या नझीर मोहम्मद खान यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारून सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.युसूफअली चौकातील इंद्रायणी नगरमध्ये नझीर मोहम्मद वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी लग्नकार्य असल्याने येणाऱ्या-जाणाºयांची गर्दी झाली होती. याच संधीचे सोने करीत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या अंगावर गुंगी आणणारे औषधाचा फवारा केला. त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यामुळे गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या घरातील २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, ३० हजारांचे सोने, तसेच नगदी ८० हजार रुपये, असा एकूण सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. गुरुवारी पहाटे नझीर यांना जाग आली असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी थेट अकोट फैल पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजू भारसाकळे करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkot Failअकोट फैलCrimeगुन्हा