शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘एटीएस’च्या आरोपीची न्यायालयात पेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:08 IST

अकोला :दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रकरणे चालवण्यात येत असलेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयात पुसद येथील एका प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकाची साक्ष नोंदवली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रकरणे चालवण्यात येत असलेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयात पुसद येथील एका प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकाची साक्ष नोंदवली. पुसद येथे २0१५ मध्ये बकरी ईदच्या दिवशी निघालेल्या रॅलीत दगडफेक झाली होती. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. आरोपींनी आक्षेपार्ह घोषणाबाजी व दगडफेक केल्याप्रकरणी अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक याला पुसद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर पुसद पोलीस ठाण्यात कलम ३0७ नुसार गुन्हे दाखल केले होते. या तपासात पोलिसांना आरोपीकडून आक्षेपार्ह व देशविघातक कृत्यासंदर्भात कागदपत्रे आढळली होती. तसेच यामध्ये आणखी दोन युवकांचा समावेश असल्याचेही समोर आले होते. नंतर या तिघांवरही अकोला दहशतवाद विरोधी पथकाने देशविघातक कृत्यात सहभागी असण्याच्या संशयावरून गुन्हे नोंदवले होते. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. यावेळी यवतमाळ तहसील कार्यालयातील गुट्टे नामक व्यक्तीची साक्ष न्यायालयाने नोंदवली. आरोपीकडून अँड. दिलदार खान व अँड. अली रजाखान यांनी, तर एटीएसच्या वतीने नागपूर येथील अँड. सत्यनाथन यांनी काम पाहिले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCourtन्यायालयCrimeगुन्हा