शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मालकीणीला बेशुद्ध करून मुद्देमाल पळविणारा जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:43 IST

अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्‍या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली.

ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलिसांची कारवाईआरोपीस मुद्देमालासह दिल्लीतून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्‍या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीकडून तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सर्वोपचार रुग्णालयासमोरील यमुना संकुल अपार्टमेंटमध्ये नरेंद्र राठी व त्यांची पत्नी उमा राठी रहिवासी आहेत. त्यांचे दुकान असून, तेथे तीन ते चार नोकर काम करतात. त्यापैकी मो. समीर मो. तस्लीम हा युवकही कामाला होता. त्याने राठी यांना चार दिवसाआधी २५ हजार रुपये मागितले होते; परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नोकर समीर त्यांच्या दुकानात कामावर येत नव्हता. त्याने बुधवार १७ जानेवारी रोजी सायंकाळी मालक नरेंद्र राठी यांचे घर गाठले. मालकाने पपई पाठविली असल्याचे सांगून मालकीणकडे ती पपई दिली. उमा राठी पपई घेऊन पाठीमागे वळताच त्याने मालकीणला बेशुद्ध करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व कपाटात ठेवलेले ४0 हजार रुपये रोख, असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनीही त्यांच्या पथकासह धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी समीरसोबत काम करणार्‍या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते; मात्र त्यांना या प्रकाराची माहिती नसल्याने पोलिसांनी समीरच्या गावचा शोध सुरू केला. यावरून मो. समीर मो. तस्लीम हा दिल्लीत असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनातील पथकाचे पीएसआय अमित डहारे, यशोधन जंजाळ, अभय बावस्कर यांनी दिल्ली येथून आरोपीस अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार अनिल जुमळे व पथकाने केली.

टॅग्स :City kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हाArrestअटक