शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : समता कॉलनीतील देहव्यापार अड्डय़ावर धाड; चार महिलांसह सहा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:27 IST

अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणावरून चार महिलांसह एक ग्राहक व घर भाड्याने घेणार्‍या सुरेश गांधी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देरिंग रोडवरील आलिशान बंगल्यास होता गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणावरून चार महिलांसह एक ग्राहक व घर भाड्याने घेणार्‍या सुरेश गांधी याला ताब्यात घेण्यात आले आहे.समता कॉलनीतील एक आलिशान बंगला सुरेश राधाकिसन गांधी याने भाड्याने घेतला होता. सदर बंगल्यात गांधी चार महिलांकडून देहव्यापार करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या, खदान पोलिसांनी या देहव्यापार अड्डय़ावर पाळत ठेवून मंगळवारी एक फंटर ग्राहक आणि त्याच्यासोबत एका पोलीस कर्मचार्‍यास ग्राहक म्हणून पाठविले. या दोघांना एक हजार रुपयांची मागणी झाल्यानंतर त्यांनी दबा धरून असलेल्या पोलिसांना इशारा देताच खदान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या ठिकाणावरून सुरेश राधाकिसन गांधी, एक ग्राहक आणि चार महिलांना ताब्यात घेतले. या चार महिलांमध्ये एका महिलेचे वय ५३ असून, दुसरीचे ४५ आहे, तर तिसर्‍या महिलेचे ३५ वय असून, चौथी महिला २३ वर्षांची आहे. या चारही महिलांना त्यांच्या पतीने सोडले असल्याची माहिती असून, त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी कारवाई केल्यानंतर महिलांना ताब्यात घेतले आहे. या चार महिलांसह सुरेश गांधी व ग्राहकाविरुद्ध पीटा कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सुरेश गांधीचे ५00 रुपये कमिशन या बंगल्यात आणल्यानंतर ग्राहकाकडून एक हजार रुपये घेण्यात येत होते. यामधील केवळ ५00 रुपये महिलांना देऊन ५00 रुपयांचे कमिशन स्वत: सुरेश गांधी ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. गत अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याचेही समोर आले आहे.

आक्षेपार्ह साहित्य जप्तसमता कॉलनीतील या बंगल्यातून पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. यामध्ये मोबाइल काही सीडी व रोख रक्कम असून, या मुद्देमालाची किंमत ६५ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आक्षेपार्ह साहित्य जप्त करीत असतानाच एका खोलीत एक ग्राहकही पोलिसांना नको त्या अवस्थेत आढळला.

नागरिकांनी केल्या तक्रारीया परिसरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई के ली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनCrimeगुन्हा