शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-नाम’ योजनेचा फज्जा; बोली पद्धतीतूनच लिलाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:50 IST

Akola APMC, Agriculture Sector बाजार समितीमधील ई-नाम योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीने होणारे लिलाव बंद करून त्याऐवजी शेतमालाच्या आॅनलाइन लिलावासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले; मात्र या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे वास्तव आहे.केंद्र सरकारने २०१६ पासून राष्ट्रीय कृषी बाजार ही योजना सुरू केली. बाजार समित्यांमधील शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापारी पोर्टल तयार करण्यात आले व कृषी उत्पन्न बाजार समित्या या पोर्टलशी जोडण्यात आल्या. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ ते ५० टक्के शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार आॅनलाइन लिलावाद्वारे होत असले तरी, ५० ते ५५ टक्के शेतमाल शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच होत असल्याचे वास्तव आहे.शेतमालाच्या आॅनलाइन खरेदी-विक्री व्यवहारासाठी शेतकऱ्यांसह व्यापारी व अडत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बाजार समितीमधील ई-नाम योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.ई-नाम योजना अंतर्गत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ ते ५० टक्के शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. उर्वरित ५० ते ५५ टक्के शेतमाल खरेदी -विक्रीचे व्यवहार पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच होतात. आॅनलाइन लिलावाद्वारे शेतमाल खरीदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात शेतकऱ्यांसह व्यापारी व अडत्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.- शिरीष धोत्रेसभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAgriculture Sectorशेती क्षेत्रAkolaअकोलाFarmerशेतकरी