शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:28 IST

अकोला : तोष्णीवाल ले-आउटमधील शासकीय दूध डेअरी परिसरातील एसी प्लांटचा पाइप लिकेज झाल्यामुळे अमोनियाची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना डोळे, श्वास व दम लागण्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला.

अकोला : तोष्णीवाल ले-आउटमधील शासकीय दूध डेअरी परिसरातील एसी प्लांटचा पाइप लिकेज झाल्यामुळे अमोनियाची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना डोळे, श्वास व दम लागण्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. अग्निशमन दलाच्या आठ बंब पाण्याने ही गळती रोखण्याचे प्रयत्न सुरूच असून, एसी प्लांटमधील अमोनिया दुसऱ्या एका टाक्यात साठविण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही पाइप व टाकीतील काही अमोनिया अद्याप गळत असल्याने अग्निशमन विभागाने त्यावर पाण्याचा मारा सुरूच ठेवला आहे.शासकीय दूध डेअरी परिसरात पाठीमागच्या बाजूला एसी प्लांट कार्यान्वित आहे. या प्लांटमधील एका पाइपला गुरुवारी सायंकाळी अचानक लिकेज झाला. त्यामुळे अमोनियाची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. काही नागरिकांना श्वास, दमा व डोळ्याला खाज येण्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासकीय दूध डेअरीतील अधिकारी व कर्मचाºयांच्या हलगर्जीने अमोनियाची गॅस गळती सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांना या घातक प्रकाराची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या तीन वाहनांद्वारे या गळतीवर पाणी टाकणे सुरू करण्यात आले; मात्र कर्मचाºयांनाही श्वास घेण्याचा प्रचंड त्रास होत असल्याने कर्मचारी बदलून वारंवार पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. आठ बंब पाणी रिचविल्यानंतर येथील गॅस गळतीचा त्रास कमी झाला, तसेच बाजूलाच असलेल्या एका रिकाम्या टाकीमध्ये अमोनिया गॅस साठविण्यात आला; मात्र तरीही पाइप व टाकीतील काही अमोनियाची गळती सुरूच असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या गळतीची माहिती मिळाल्यानंतर खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्यासह सिव्हिल लाइन पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले होते. मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख रमेश ठाकरे यांनीही तळ ठोकून ही गळती रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शासकीय दूध डेअरीचे अधिकारी निष्काळजीशासकीय दूध डेअरीत अमोनिया गॅस गळती सुरू झालेली असताना येथील अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत होते. त्यांना या गळतीची कल्पनाही नव्हती. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर ही गळती रोखण्यासाठी तसेच दुसºया टाकीत साठविण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र येथील अधिकाºयांचा कारभारात हलगर्जी असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात