शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-अकोट ब्रॉडगेजची उद्या चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:51 IST

अकोला ते अकोट दरम्यानच्या ब्रॉडग्रेज मार्गाची चाचणी २३ व २४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खांडवा या रेल्वेमार्गाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून प्रस्तावित असलेल्या ब्रॉडगेज परिवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटला असताना आता अकोला ते अकोट दरम्यानच्या ब्रॉडग्रेज मार्गाची चाचणी २३ व २४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.अकोला ते अकोटपर्यंतचा ४५ किमी लांबीच्या पट्ट्याचे ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. अकोला ते खंडवा मार्गाचे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुद्यावरून रखडलेले असताना आता दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते अकोटपर्यंतचा मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. आता पुढचा भाग म्हणून अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा दौरा निश्चित झाल्याची माहिती आहे. गुरुवार २३ व शुक्रवार २४ जुलै रोजी या मार्गावर विशेष गाडी चालवून चाचणी घेतली जाणार आहे. अकोला ते गांधी स्मारक, गांधी स्मारक ते पाटसूल, पाटसूल ते अकोट व परत अकोलापर्यंत अशा टप्प्यांमध्ये दोन दिवस ही चाचणी होणार आहे. मोटार ट्रॉली व विशेष गाडी अशा दोन्ही चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वेगवान दौडचीही होणार चाचणीनव्याने टाकण्यात आलेल्या या मार्गाची क्षमता तपासण्यासाठी शुक्रवार २४ जुलै रोजी या मार्गावरून ताशी १२० किमी वेगाने गाडी नेऊन चाचणी घेतली जाणार आहे. विशेष चाचणी गाडी अकोट येथून १२.१५ ला सुरू होऊन १ वाजता अकोला येथे पोहोचेल, असे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणrailwayरेल्वे