शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पतीने साथ सोडल्यानंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:14 IST

सायखेड (अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील श्रीधर इंगळे यांनी पत्नीच्या उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे सात महिन्यांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किडनीच्या आजाराशी संघर्ष करीत अखेर त्यांच्या पत्नी धृपताबाई इंगळे यांनीही १८ फेबु्रवारी रोजी अकोला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला. 

ठळक मुद्देसात महिन्यांपूर्वी पतीने केली होती आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड (अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील श्रीधर इंगळे यांनी पत्नीच्या उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे सात महिन्यांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किडनीच्या आजाराशी संघर्ष करीत अखेर त्यांच्या पत्नी धृपताबाई इंगळे यांनीही १८ फेबु्रवारी रोजी अकोला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला. धृपताबार्इंच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्याने त्यांना वाचविण्यासाठी पतीने स्वत:ची एक किडनी देण्याचे ठरविले होते; परंतु त्यापूर्वीच त्यांचा घात झाला. दारिद्र्यात जीवन जगत असताना पत्नीवर महागडे उपचार कसे करावे, शासनाच्या आरोग्य विभागाकडे दुर्धर आजारासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करूनही मदत मिळाली नाही,अशातच त्यांनी नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी हिम्मत न हारता आईला वाचविण्यासाठी धडपड केली. कसेबसे जमविलेल्या पैशातून उपचार सुरू ठेवले; परंतु जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना आईनेही साथ सोडली. याचा धक्का इंगळे कुटुंबाला बसला. धृपताबाई इंगळे यांच्यावर १९ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. पती पत्नीच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळी