शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ट्रान्सफॉर्मरमधून तेल चोरणारी टोळी ‘एमआयडीसी’त सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:47 IST

अकोला : महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढून त्याची तस्करी करणारी टोळी स्थानिक एमआयडीसी परिसरात सक्रिय असून, याकडे ‘एमआयडीसी’ प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात घडल्या दहा घटना रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढून त्याची तस्करी करणारी टोळी स्थानिक एमआयडीसी परिसरात सक्रिय असून, याकडे ‘एमआयडीसी’ प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मागील एका महिन्यात अशा प्रकारच्या दहा चोरीच्या घटना समोर आल्या असून, एमआयडीसी परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी पुन्हा अशीच घटना एमआयडीसी फे स क्रमांक-३ च्या सुदर्शन इंडस्ट्रीजवळ आणि फेस क्रमांक दोनमध्ये घडली आहे.ट्रान्सफॉर्मरमधील तेलाची चोरी काही सेकंदात होत नाही. त्यासाठी मोठी यंत्रणा आणि कि मान ३0 ते ३५ मिनिटे लागतात. ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढल्यानंतर ते कॅन किंवा ड्रममध्ये भरून वाहून नेण्यासाठी टँकर किंवा ऑटोरिक्षाचा वापर होत असेल. त्यामुळे या तेल तस्करीत टोळी असण्याची दाट शक्यता आहे. दररोज मोठय़ा प्रमाणात तेलाची तस्करी होत असताना कुणाचे लक्ष त्याकडे जात नसेल काय, असा प्रश्न एमआयडीसीतील उद्योजक आणि नागरिकांमधून उपस्थित होत आहे. ट्रान्सफॉर्मरमधून होणारी तेल चोरी पोलिसांच्या नजरेतून कशी सुटते, असा प्रश्नही केला जातो आहे. ज्या भागात तेलाची चोरी होत आहे, त्या परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविली पाहिजे. सोबतच ट्रान्सफॉर्मर असलेल्या ठिकाणी परिसरातील उद्योजकांनी चौकीदारास लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. एमआयडीसीतील तेल चोरी करण्याचे प्रकार वाढले असल्याने उद्योजक त्रासले आहेत. महावितरण कंपनी, पोलीस यांनी तेलाची तस्करी करणार्‍या टोळी गजाआड करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याची तयारी उद्योजकांमध्ये सुरू आहे.

वीज पुरवठा होतो खंडितट्रान्सफॉर्मरमधील तेल काढल्या गेल्यानंतर काही वेळात परिसराला होणारा वीज पुरवठा खंडित होतो. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तेल काढून विकणारी टोळी सक्रिय असल्याशिवाय हे शक्य नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाल आहेत; मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळmahavitaranमहावितरण