शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी गहाळ झालेल्या ६0 फायली आल्या परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:23 IST

अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी ६0 फायली जिल्हा परिषदेत परत आल्या आहेत. उर्वरित १६ फायली अद्यापही कार्यालयाबाहेर आहेत. त्यातच नोटीस बजावलेल्या तिघांपैकी एक नवृत्त दुसरा बडतर्फ तर सेवेत असलेल्या तिसर्‍यावर सर्वाधिक फाइलची जबाबदारी असताना त्या कर्मचार्‍याने अद्यापही स्पष्टीकरण सादर केली नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे१६ फायली अद्यापही बाहेर : सर्वाधिक फायलीबाबत स्पष्टीकरण नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या ७६ शिक्षकांपैकी ६0 फायली जिल्हा परिषदेत परत आल्या आहेत. उर्वरित १६ फायली अद्यापही कार्यालयाबाहेर आहेत. त्यातच नोटीस बजावलेल्या तिघांपैकी एक नवृत्त दुसरा बडतर्फ तर सेवेत असलेल्या तिसर्‍यावर सर्वाधिक फाइलची जबाबदारी असताना त्या कर्मचार्‍याने अद्यापही स्पष्टीकरण सादर केली नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमुळे बिंदूनामावलीत मोठा घोळ आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या ७६ शिक्षकांच्या फायली गहाळ आहेत. त्यांच्या केवळ आदेशाच्या प्रती उपलब्ध आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात फाइल कोणी तयार केली, त्या फाइलला कोणी मंजुरी दिली, त्यानुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठीचे आदेश कोणी दिले, फाइल सुरू होण्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास, याबाबतचा कुठलाच कागद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. त्या शिक्षकांना फाइल सादर करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी २ डिसेंबर रोजी दिली. त्यासोबतच या प्रकाराला जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांनाही नोटीस बजावली. त्यापैकी चौघांनी स्पष्टीकरण दिले, तर सेवानवृत्त कक्ष अधिकारी रंजना गेडाम, बडतर्फ कर्मचारी बिपिन कमाविसदार यांच्या नोटीसबाबतच संभ्रम आहे. 

चौघांचे अद्यापही स्पष्टीकरण नाही!इतर जिल्हा परिषदेतून आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर त्यांच्या फाइल जतन करण्याची जबाबदारी अकोला जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांनी फाइल सादर न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नोटीसप्राप्त अधिकार्‍यांमध्ये सेवानवृत्त कक्ष अधिकारी रंजना गेडाम यांना तीन, बाळापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक दिनेश ढाकरे-एक, कमाविसदार यांनी स्पष्टीकरण सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना स्मरणपत्र देण्याची तयारी सुरू आहे. त्याचवेळी स्पष्टीकरण सादर केलेल्यांच्या संदर्भातही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. 

सर्वाधिक फायलींबाबत संतोष टाले मौनया प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक संतोष टाले यांची आहे. स्पष्टीकरण सादर करणार्‍या चौघांपैकी दोघांनी प्रभार घेताना टाले यांच्याकडून फायली मिळाल्याच नसल्याचे म्हटले. गहाळ झालेल्या ७६ पैकी ३२ फायलींची जबाबदारी टाले यांची आहे. त्यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नाही. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक