शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ५० लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:24 IST

४९ लाख ८१ हजार रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

अकोला : जठारपेठ परिसरात असलेल्या एमजीआर या देशी व विदेशी दारूच्या दुकानात तसेच दुकानावरील गोदामातून अवैधरीत्या साठवणूक केलेला तब्बल ४९ लाख ८१ हजार रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. तब्बल दोन दिवस चाललेल्या या छापेमारीत ५० लाखांचा दारूसाठा जप्त  केलाजठारपेठ परिसरातील रहिवासी सचिन महादेवराव राऊत याच्या मालकीचे एमजीआर देशी व विदेशी दारूचे दुकान आहे. या दुकानाच्या परिसरात तब्बल दोन ट्रक देशी व विदेशी दारूचा साठा करण्यात आल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकल्यानंतर येथील तब्बल २ ट्रक देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. रविवार व सोमवार असे दोन दिवस या दारूच्या साठ्याची मोजणी झाल्यानंतर तब्बल ४९ लाख ८१ हजार रुपयांचा हा दारूसाठा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सदर दारूसाठा हा सचिन महादेवराव राऊत याचा असल्याचे समोर येताच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईची माहिती देण्यास दिरंगाईदरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्यानंतर प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गत दोन दिवसांपासून कारवाईसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले. दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असताना एवढी मोठी कारवाई करणे कौतुकास्पद असतानाही सदर विभागाने मात्र प्रचंड गोपनीयता पाळल्याने संशयाची पालवी फुटत आहे.पोलिसांकडून दीड लाखांची सेटिंग?उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ५० लाख रुपयांचा दारू साठा ज्या ठिकाणावरून जप्त केला, त्याच ठिकाणावर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी व काही कर्मचाºयांनी छापा टाकला होता; मात्र दारूची एकही बॉटल नसल्याच्या आविर्भावात पोलीस खाली हात परतले होते. या प्रकरणात दीड लाखांची सेटिंग झाल्याची चर्चा पोलिसांच्याच वर्तुळात जोरात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी