शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अजय लहाने यांची अखेर बदली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:29 AM

अकोला :  महापालिका आयुक्त अजय लहाने यांची अखेर यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश नगर विकास विभागाने १0 ऑगस्ट रोजी जारी केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ हे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. 

ठळक मुद्देजितेंद्र वाघ नवे मनपा आयुक्त 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  महापालिका आयुक्त अजय लहाने यांची अखेर यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश नगर विकास विभागाने १0 ऑगस्ट रोजी जारी केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ हे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. १२ सप्टेंबर २0१५ रोजी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारलेल्या अजय लहाने यांनी, प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी मनपातील रिक्त पदांवर सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती व्हावी, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. परिणामस्वरूप सर्व रिक्त पदांवर शासनाने अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या. कामचुकार कर्मचार्‍यांना वठणीवर आणत त्यांनी प्रशासकीय कामकाज सुधारण्यासाठी आकृतीबंध, बिंदू नामावली आदींसारख्या क्लिष्ट मुद्यांना हात लावला. थकीत वेतनाची समस्या लक्षात घेऊन जीपीएस प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून सुधारित कर लागू केला. राज्य सरकारने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अकोला शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर लहाने यांनी प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करुन शहरात एलईडी पथदिवे लावण्याच्या कामाला गती दिली. त्यांच्या कार्यकाळात घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटा गाड्यांची यंत्रणा कार्यान्वित झाली. कचरा गोळा करण्यासाठी खुप खर्च होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, लहाने यांच्या पुढाकाराने १६ ट्रॅक्टरची खरेदी करण्यात आली. सिटी बस सेवेचा क रारनामा मनपाच्या हिताचा करून बस सेवा सुरू करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरु होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचीही तयारी चालविली होती. अशातच शुक्रवारी अचानक त्यांच्या बदलीचा आदेश येऊन थडकला. आयुक्त पदाचा प्रभार तूर्तास जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

उपायुक्तांच्या    बदलीची चर्चा!मनपातील उपायुक्त समाधान सोळंके यांचीही बदली झाल्याची चर्चा रंगली होती. तसा प्रस्ताव सोळंके यांनी आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती आहे; मात्र, आयुक्तांच्या बदलीमुळे सोळंके यांच्या बदलीची शक्यता धूसर झाली आहे.

रस्ता रुंदीकरणाला चालना अजय लहाने शहरातील प्रमुख रस्ते प्रशस्त असावेत यासाठी आग्रही होते. शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रकाशित होऊन, कामांचे वर्कऑर्डर दिल्यानंतरही, रस्त्यांचे ‘वर्किंग एस्टिमेट’ बदलण्याचे धाडस त्यांनी केले. अवघ्या १८ ते २0 फूट रुंदीचे रस्ते त्यांच्या आग्रहामुळे ३५ ते ४0 फूट रुंद झाले. 

यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदस्थापनेवर बदली झाली आहे. पाणीपुरवठय़ाच्या कामांसह रस्ते विकासाची कामे पूर्ण करायची होती. सुधारित कर प्रणालीमुळे कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघेल, ही अपेक्षा आहे.- अजय लहाने, आयुक्त, मनपा

मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे समजले; मात्र अद्याप नगर विकास विभागाकडून कार्यमुक्त केल्याचा आदेश मिळालेला नाही. - जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी ‘एमएमआरडीए’

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका