शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अचानक आवाज; सर्वत्र धूर, पाचव्या मजल्याहून उतरले अन् मी वाचले, अकोल्यातील डॉ. ऐश्वर्या तोष्णीवाल सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:07 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये डाॅक्टरांच्या वसतिगृहावर एअर इंडियाचे विमान कोसळून गुरुवारी भीषण अपघात झाला. त्यामध्ये येथील ‘डीएम ऑन्काॅपॅथाॅलाॅजी’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली अकोला शहरातील रहिवासी डाॅ. ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी थोडक्यात बचावली आहे.

अकोलाअहमदाबादमध्ये डाॅक्टरांच्या वसतिगृहावर एअर इंडियाचे विमान कोसळून गुरुवारी भीषण अपघात झाला. त्यामध्ये येथील ‘डीएम ऑन्काॅपॅथाॅलाॅजी’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली अकोला शहरातील रहिवासी डाॅ. ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी थोडक्यात बचावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत संबंधित विद्यार्थिनीचे वडील अमोल तोष्णीवाल यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधण्यात आला असून, मुलगी सुरक्षित असल्याची माहिती वडिलांनी प्रशासनाला दिली.

भीषण दुर्घटनेत शिकाऊ डाॅक्टरांसह २४ जणांचाही मृत्यू झाला आहे. ज्या वसतिगृहाच्या परिसरात दुर्घटना घडली, त्याच परिसरातील एका इमारतीमध्ये अकोल्यातील डाॅ. ऐश्वर्या अमोल तोष्णीवाल हीदेखील राहत होती. ती येथील गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ‘डी.एम. ऑन्काॅपॅथाॅलाॅजी’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. या घटनेची भीषणता तिने कुटुंबियांना कळविली.

...अन् जीव वाचविला अपघात घडला त्यावेळी ऐश्वर्या हाॅस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होती. विमान दुर्घटनेत अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ती अंगावर चादर घेऊन पाचव्या मजल्यावरून खाली उतरली व तिने स्वत:चा जीव वाचविला.  

‘दुर्घटनेनंतर तिचा फोन आला तेव्हा घाबरलो’विमान दुर्घटनेनंतर मुलगी डाॅ. ऐश्वर्या हिचा गुरुवारी फोन आला तेव्हा जीव घाबरला होता, सुचेनासे झाले होते. व्हिडीओ काॅलद्वारे कुटुंबीयांचे तिच्याशी बोलणे झाल्यानंतर आणि मुलगी सुखरूप असल्याने दिलासा मिळाला, असे डाॅ. ऐश्वर्या यांचे वडील अमोल तोष्णीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादAkolaअकोला