लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - अहमदाबाद ते चेन्नई एक्स्प्रेसमधून एका प्रवाशाची बॅग चोरून, त्यामधील मोबाइल व लॅपटॉप चोरी करून ते खरेदी-विक्री करणार्यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली.एका प्रवाशाची बॅग रेल्वेतून लंपास करण्यात आली होती. या बॅगमधील मोबाइल व लॅ पटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरी केला होता. सदरचा मोबाइल वैभव गाडगे याने, तर लॅपटॉप मिथुन दावत या दोघांना विकण्यात आला होता. पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करताना मोबाइल व लॅपटॉपची बॅग चोरी करणारा राजेश अनिल बोदडे याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सदर बॅग इराणी झोपडपट्टी येथील रहिवासी जाफर अली आसीफ अली याने चोरल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी जाफर अलीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, मोबाइल व लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल व लॅपटॉप चोरणारे गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:41 IST
अकोला - अहमदाबाद ते चेन्नई एक्स्प्रेसमधून एका प्रवाशाची बॅग चोरून, त्यामधील मोबाइल व लॅपटॉप चोरी करून ते खरेदी-विक्री करणार्यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली.
अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल व लॅपटॉप चोरणारे गजाआड!
ठळक मुद्देबॅगमधील मोबाई व लॅपटॉपची झाली विक्रीसदर बॅग इराणी झोपडपट्टी रहिवासी जाफर अली आसीफ अली याने चोरल्याची माहिती