शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठ संशोधकांचे मार्गदर्शन केवळ प्रगत शेतकऱ्यांपर्यंतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:54 IST

यंदा कोरोनाच्या भीतीपोटी संशोधक विद्यापीठाच्या बाहेर जाण्यास टाळत असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदा कृषी विद्यापीठाचे बहुतांश कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातूनच राबविले जात आहेत; मात्र हे कार्यक्रम प्रगत आणि प्रगतिशील शेतकरी वगळल्यस बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. वाणीचा हल्ला अन् दुबारपेरणीचे संकट शेतकºयांवर ओढवले असताना कृषी संशोधकांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन उद््भवलेल्या परिस्थितीवर मार्गदर्शन करण्याची गरज आहे; परंतु कोरोनाच्या भीतीपोटी संशोधक यंदा शेतकºयांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या; पण मध्येच पावसाने दडी मारली अन् दुबार पेरण्यांचे संकट ओढवले. तर दुसरीकडे अंकुरित पिकांवर वाणीनेही हल्ला केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. दरवर्षी अशा संकटाच्या काळात कृषी विद्यापीठाचे संशोधक थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करतात; परंतु यंदा कोरोनाच्या भीतीपोटी संशोधक विद्यापीठाच्या बाहेर जाण्यास टाळत असल्याचे वास्तव आहे. शिवाय बहुतांश मार्गदर्शन कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातूनच शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, बहुतांश पारंपरिक शेतकºयांना अद्यपाही कृषी संशोधकांकडून मार्गदर्शन मिळाले नाही. अशा परिस्थितीत करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे.पारंपरिक शेतकºयांकडे दुर्लक्ष कृषी विद्यापीठाकडून राबविण्यात येणारे आॅनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम केवळ प्रगत शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे. हे प्रमाण केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंत आहे; परंतु उर्वरित पारंपरिक शेतकºयांपर्यंत अजूनही योग्य प्रमाणात तंत्रज्ञान पोहोचले नाही, तर काही भागात नेट कनेक्टिव्हिटीचीही समस्या आहे.

मी स्वत: कृषी विद्यापीठाच्या आॅनलाइन कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. मार्गदर्शन तर मिळाले; परंतु ते सर्वच शेतकºयांपर्यंत पोहोचू शकले नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.- विलास ताथोड, शेतकरीआॅनलाइन माध्यमातून कृषी विद्यापीठ बहुतांश शेतकºयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कनेक्टिव्हिटीच्या काही समस्या आहेत; मात्र शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विद्यापीठ निरंतर कार्यरत आहे.- डॉ. डी.एम. मानकर,शिक्षण विस्तार संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला

 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठFarmerशेतकरी