शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कृषी विद्यापीठाचा कर्मचारी, कृषी निविष्ठांवर कोट्यवधींचा खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:14 IST

अकोला : विदर्भ कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पेरणी ते कर्मचार्‍यांचा होणारा खर्च तीन कोटींच्या घरात आहे; परंतु मागील एक महिन्यापासून कृषी विद्यापीठ रोजंदारी कर्मचार्‍यांचा संप सुरू  असल्याने जवळपास सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकापेक्षा तण मोठे झाले असून, संपूर्ण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पीक मोकाट गुरांनी फस्त केले आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांचा संपजवळपास सर्वच पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पेरणी ते कर्मचार्‍यांचा होणारा खर्च तीन कोटींच्या घरात आहे; परंतु मागील एक महिन्यापासून कृषी विद्यापीठ रोजंदारी कर्मचार्‍यांचा संप सुरू  असल्याने जवळपास सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकापेक्षा तण मोठे झाले असून, संपूर्ण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पीक मोकाट गुरांनी फस्त केले आहे.‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्‍यांच्या संपाला एक महिना झाला आहे. या संपामुळे कृषी विद्यापीठाची शेतीची कामे पूर्णत: ठप्प आहेत; परंतु अद्याप तोडगा निघाला नाही. या संपाची अद्याप दखल घेतली गेली नसल्याने कृषी विद्यापीठाच्या जवळपास अडीच हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कर्मचार्‍यांच्या वेतनावर अडीच ते तीन कोटी रुपये वर्षाकाठी खर्च केले जातात तर दरवर्षीची प्रक्षेत्रातील शेतीची मशागत, कृषी निविष्ठा ते पेरणी, फवारणीचा जवळपास ७५ लाख ते एक कोटी रुपये खर्च होत असतो.यावर्षी सर्वच क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. तथापि, पेरणीच्या पंधरा दिवसनंतरच कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. एकही कर्मचारी कामावर नसल्याने उभी पिके गुरांनी फस्त केली आहेत. गुरांचा मुक्त संचार वाढल्याने ही गुरे थेट कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू  कार्यालयापर्यंत पोहोचलेली दिसतात. मूग, उडिदाचे उभे पीक वाया गेले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधित बीटी कापसाची यावर्षी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेतली जात आहे. तथापि, याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने या पिकात तण वाढले असून, किडींचाही प्रादुर्भाव वाढला आहे. संपाचा फटका या कापसालाही बसला आहे.दरम्यान, एक महिना मजुरांचा संप चालावा हे आश्‍चर्य आहे. कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील मुख्यालयी वेगवेगळ्य़ा पद्धतीने आंदोलन करू न कृषी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप तोडगा न निघाल्याने इतर संशोधनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

जवळपास तीन कोटी रुपये दरवर्षी कर्मचार्‍यांच्या वेतनावर खर्च होतात तसेच खरीप हंगामातील पेरणी, कृषी निविष्ठा तसेच पिकांच्या मशागतीसाठी दरवर्षी एक कोटीच्यावर खर्च होतो. - डॉ.डी.एम. मानकर, संचालक संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.