शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारचळ! वृद्ध तांत्रिकाने 23 वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 12:34 IST

चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत 76 वर्षीय वृद्ध तांत्रिकाने चान्नी येथील 23 वर्षीय विवाहित युवतीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या भावाने 15 मे रोजी चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

पातूर : चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत 76 वर्षीय वृद्ध तांत्रिकाने चान्नी येथील 23 वर्षीय विवाहित युवतीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या भावाने 15 मे रोजी चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील 76 वर्षीय गुलाब चिन्काजी काळबागे हे जवळपास दीड ते दोन वर्षांपासून चान्नी येथे कामधंदा करून राहत असत. गावातील लोकांना मी गुप्तधन काढतो, असे सांगून खोटे बोलत असत. अशातच युवती ही आपल्या पतीसोबत पटत नसल्यामुळे माहेरी आईवडिलांकडे राहण्यास आली होती. हा वृद्धसुद्धा मुलीच्या घरी ये-जा करत होता. अशातच तक्रारकर्त्याच्या बहिनीसोबत त्या वृद्धाची चांगली ओळख होऊन तिचे वृद्धासोबत संबंध जुळले. या ओळखीतून वृद्धाने त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याजवळ शेत आहे व गुप्तधन काढण्याचा माझा धंदा आहे. माझ्याजवळ खूप सोने आहे व शेती आहे. त्याचे मी काय करू, त्याला कोणी वारस नाही, असे खोटे बोलून 15 मे रोजी पहाटे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान मुलीला घेऊन पळून गेला. अखेर मुलीच्या आईवडिलांनी व भावाने शोध घेतला असता ती व्याळा येथे असल्याचे समजले.तेथे वृद्धाच्या घरी गेले असता त्याने युवतीच्या आईवडील व भावाचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या तांत्रिकावर कारवाई करून त्याच्या तावडीतून माझ्या बहिणीची सुटका करावी, अशी तक्रार चान्नी पोलीस स्टेशनला गणेश सुखदेव वानखडे यांनी दिली आहे. मुलीचा शोध घेतल्यानंतर तिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर उभे करून तिचा जबाबात घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. कारण मुलगी सज्ञान आहे.- गजानन खर्डे ठाणेदार, चान्नी

टॅग्स :MolestationविनयभंगAkolaअकोला