शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वय वर्ष ९८...अजूनही कसतात शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 10:25 IST

या वयातही ते शेतात वखर, डवरे हाकण्याचं काम करतात

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : साठी ओलांडलेले अनेक जण अंथरूणाला खिळलेले किंवा काहीतरी व्याधींनी त्रस्त असलेले अनेक लोक आपण पाहतो; परंतु आज तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील नºही रावजी अढाऊ या आजोबांचे वय तब्बल ९८ वर्ष आहे. दोन वर्षानंतर वयाचं शतक हे आजोबा साजरं करतील. या वयातही ते शेतात वखर, डवरे हाकण्याचं काम करतात. त्यांच्यातील आत्मविश्वास, फिटनेस कमालीचा आणि तरुणाईलाही लाजवणारा असाच आहे.चार पिढ्यांपासून हे नºहजी अढाऊ शेतात राबत आहेत. आतासुद्धा मुले, नातवंडांसोबत शेतीची मशागत करतात. दररोज शेतात जाणे, शेतातील कामे करणे, हा त्यांचा दिनक्रम आहे. लहानपणापासून वडिलांच्या सोबतीने शेतात राबले. त्यांना मुले, सुना त्यांना आराम करण्यास सांगतात; परंतु त्यांना काम स्वस्थ बसू देत नाही. ते आवडीने बैलजोडी स्वत: हाकून वखर, डवरणी, निंदणाची कामे करतात. त्यांना कुठलाही आजार नाही, स्मरणशक्ती साबुत आहे. शेतात गेलो नाही तर करमत नाही, असे ते म्हणतात. या वयातही त्यांची काम करण्याची वृत्ती, जोश पाहून अनेकांना अप्रूप वाटते.शेताचे केले नंदनवननºहीजी अढाऊ यांनी मुलांना सोबतीला घेऊन कोरडवाहू, नंतर बागायती शेतीवर भर दिला. पारंपरिक पिकांसोबतच, त्यांनी भाजीपाला पिकाची जोड दिली. यासोबतच फळझाडे, फुलझाडांची शेताच्या बांधावर लागवड केली. त्यामध्ये बोर, चिंच, पेरू, आंबा, फणस, सीताफळ, रामफळा आदी झाडांचा समावेश आहे. त्याच बरोबर झेंडू, गुलाब आदी फुलांचे उत्पादनसुद्धा ते घेतात. घरी बसून आराम करण्याच्या वयातही ते शेत काम स्वत:ला गुंतवून ठेवतात. त्यांना कोणताही आजार, व्याधी नाही. शेतातील कामांमुळे त्यांचे शरीर एकदम फिट आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराFarmerशेतकरीagricultureशेती