लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट शहरातील टेकडीपुरा या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी १२ जुलैच्या रात्री धाड टाकून आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेकडीपुरा परिसरात ताश-पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष श्ािंदे, पोलीस कर्मचारी जितेंद्र कातखेडे, वीरेंद्र लाड, राहुल वाघ या पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी परेश प्रमोद मनियार रा. टेकडीपुरा, रोहित दिलीपसिंग ठाकूर रा. शनवारपुरा, अंकुश राजू रघुवंशी रा. गवळीपुरा, गोलू भिकू बेंडवाल रा. वाल्मीक नगर, अमोल श्रीकृष्ण चिंचोळकर रा. बुधवार वेस, सागर श्याम चोंबडे रा. अमरावती, आकाश संतोष चावरे रा. अमरावती व चेतन प्रमोदकुमार मनियार रा. गुजरातीपुरा या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख ७ हजार ३०० रुपये रोख, ६० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल व १० हजार रुपये किमतीचे मोबाइल असा एकूण ७७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोटात जुगारावर धाड; आठ आरोपींना अटक
By admin | Updated: July 13, 2017 01:14 IST