शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अखेर अकोला शहरातील मृत डुकरांचे केले ‘पोस्टमॉर्टम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:13 IST

नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देमहापौर सरसावलेस्वाइन फ्लूचा धोका टाळण्यासाठी मनपात बैठकप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात मृत डुकरांच्या संख्येत अचानक वाढ होण्यासोबतच त्यांची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट न लावता, शहरात उघड्यावरच फेकून दिले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.शहरातील गुरे-ढोरे, मोकाट श्‍वान तसेच डुकरांची कलेवरे उचलून महापालिका प्रशासनाने त्यांची डम्पिंग ग्राउंडवर अथवा शहराबाहेर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी तसेच प्रभागात नियुक्त केलेले आरोग्य निरीक्षक निष्क्रिय असल्यामुळे की काय, मृत जनावरांना चक्क शहरी भागात उघड्यावर फेकून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दोन-तीन दिवसांनंतर मृत जनावरांमधून निघणार्‍या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने डुकरांची संख्या जास्त असल्याने आणि स्वाइन फ्लूचा आजार डुकरांमुळे पसरत असल्याची सर्वसामान्यांची धारणा असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील काही विशिष्ट प्रभागांमध्ये उघड्यावर मृत डुकरांची कलेवरे आढळून आल्याच्या वृत्ताची महापौर विजय अग्रवाल यांनी गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा खरपूस समाचार घेतला. यासंदर्भात सोमवारी महापौर अग्रवाल यांनी त्यांच्या दालनात वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, मलेरिया विभाग, स्वच्छता व आरोग्य विभाग तसेच कोंडवाडा विभागाची तातडीने  बैठक बोलावली. जनावर कोणतेही असो, ते मृत पावल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता उघड्यावर फेकून दिले जात असल्याच्या प्रकारावर महापौर अग्रवाल यांनी संताप व्यक्त केला. शहराबाहेर दूर मृत जनावरांसाठी खोल खड्डा करून त्यामध्ये मीठ, चुना टाकून जमिनीत गाडण्याची सूचना महापौरांनी उपस्थित अधिकार्‍यांना केली. बैठकीला उपमहापौर वैशाली शेळके, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक शशी चोपडे, मनोज गायकवाड तसेच संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

मृत डुकरांचे केले शवविच्छेदनडुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे होतो, हे जाणून घेण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. तडकाफडकी जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. नीता गोडबोले, डॉ. नम्रता बाभूळकर, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. प्रवीण चेडे यांनी शवविच्छेदन केले असून, नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत.

‘स्वाइन फ्लू’ वर काथ्याकूट स्वाइन फ्लूची लागण नेमकी कशामुळे होते, यावर आरोग्य यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही. पुण्यात डुकराच्या माध्यमातून ‘एच-१,एन-१’ विषाणुमुळे माणसाला रोगाची लागण झाल्याचे आढळून आले होते. वैद्यकीय क्षेत्रात संबोधल्या जाणार्‍या ‘एच-१,एन-१ एन्फ्लूएन्झा फ्लू’हा संसर्गजन्य आजार मानला जातो. सर्वसामान्यांमध्ये अद्यापही डुकरांच्या माध्यमातून ‘स्वाइन फ्लू’ पसरत असल्याचा समज आहे. याविषयावर वैद्यकीय क्षेत्रात चांगलाच काथ्याकूट सुरू झाला आहे.

शहरात मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मृत जनावरांना सर्रास उघड्यावर फेकले जात असल्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, ज्या प्रभागात असे प्रकार आढळून येतील, तेथील आरोग्य निरीक्षकांची खैर नाही, हे नक्की. शहरात फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत.-विजय अग्रवाल, महापौर 

---फोटो- ५ सीटीसीएल- 0४, 0५---

टॅग्स :Akola cityअकोला शहरHealthआरोग्य