शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षानंतरही विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता केवळ एक रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:44 IST

१९९२ मध्ये सुरू केलेला दैनंदिन प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता २८ वर्षानंतरही तेवढाच दिला जात आहे.

अकोला : मागासवर्गातील विद्यार्थिनींची उपस्थिती वाढविण्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने १९९२ मध्ये सुरू केलेला दैनंदिन प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता २८ वर्षानंतरही तेवढाच दिला जात आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा शासनाकडून गेल्या काही वर्षात प्रयत्नच झाला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यातच दर तिमाही भत्ता देताना मुख्याध्यापकांना केवळ ६० ते ७० रुपयांचा धनादेश तयार करून पालकांना देण्याची कटकटही शालेय कामाव्यतिरिक्त असल्याने ती दूर करण्याची मागणी आता शिक्षक संघटनांकडून होत आहे.इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील शालेय विद्यार्थिनींना नियमित शाळेत उपस्थित राहण्यासाठी दैनंदिन १ रुपया भत्ता देण्याचा शासन निर्णय जानेवारी १९९२ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर अनुसूचित जमातींमधील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींसाठीही हा भत्ता लागू करण्यात आला. त्यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये २८ वर्षांनंतरही वाढ झालेली नाही. दैनंदिन उपस्थितीनुसार एक रुपयाप्रमाणे हा भत्ता आजही अनियमितपणे दिला जात आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रयत्न गेल्या २८ वर्षांत झालेला नाही. त्यातच दर तिमाही उपस्थितीनुसार भत्ता देताना तो केवळ ६० ते ७० दिवसाच्या हिशेबानेच द्यावा लागतो. त्यासाठी मुख्याध्यापकांना या रकमेचे धनादेश तयार करून संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना द्यावे लागतात. शैक्षणिक कार्य सोडून ही कामे करावी लागतात. तसेच कमी रकमेचे धनादेश असल्याने त्याचे रोखीकरण करण्याचा प्रयत्नही पालकाकडून केला जात नाही. त्यामुळे ही मदत वाढवण्यात यावी, अन्यथा बंद करावी, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्यामध्ये बदल होत नसल्याचा प्रकार घडत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी