शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला बार असोसिएशनद्वारा आयोजित अँडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा १७ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 20:17 IST

अकोला : अकोला बार असोसिएशनद्वारा आयोजित अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा १७ ते २१ जानेवारी या कालावधीत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे होत आहे. स्पर्धेतील सामने दिवस-रात्र (फ्लडलाइट) होतील, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ तथा क्रिकेटपटू अँड.  मुन्ना खान यांनी दिली.

ठळक मुद्दे१७ ते २१ जानेवारी या कालावधीत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला बार असोसिएशनद्वारा आयोजित अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा १७ ते २१ जानेवारी या कालावधीत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे होत आहे. स्पर्धेतील सामने दिवस-रात्र (फ्लडलाइट) होतील, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ तथा क्रिकेटपटू अँड.  मुन्ना खान यांनी दिली.अकोला बार असोसिएशनच्या नवीन सभागृहात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत स्पर्धा आयोजनाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वकिलांचे २२ ते २४ संघ सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सामने सायंकाळी ५ वाजतापासून रात्री १0.३0 पर्यंत खेळण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक अँड. मोहनराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ४१,000 व ट्रॉफी, द्वितीय पुरस्कार अँड.  शंकर ढोले यांच्यातर्फे २१,000 व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस १५,000 व ट्रॉफी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर व इतर वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेनिमित्त वकीलवर्ग पहिल्यांदा फ्लडलाइट खेळणार आहे. तसेच अकोल्यात पहिल्यांदा वकिलांसाठी फ्लडलाइट क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले असल्याचेही अँड.  खान यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांनी केली आहे. स्पर्धेच्या पूर्वसंध्येला १६ जानेवारी रोजी न्यायाधीश संघ व ज्येष्ठ विधिज्ञ संघ यांच्यात प्रदर्शन सामन्याचे आयोजन केले आहे. स्पर्धा आयोजन समितीमध्ये मार्गदर्शक अँड. बी.के. गांधी, अँड.  मुन्ना खान यांच्यासह अजय गोडे, इलियास शेखानी, पवन बाजारे, संतोष वाघमारे, शंकर ढोले, राहुल टोबरे, राहुल वानखडे, हरीश गोतमारे, विनय आठवले, भूषण जोशी आदींचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ विधिज्ञ बी.के. गांधी, अजय गोडे, इलियास शेखानी, सुमित बजाज, प्रवीण तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणुकीचा चढणार रंगस्पर्धेनंतर लगेच २४ जानेवारी रोजी अकोला बार असोसिएशनची निवडणूक आहे, त्यानंतर महाराष्ट्र अँण्ड गोवा बार असोसिएशनची निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकीमुळे या स्पर्धेला वेगळीच रंगत चढणार आहे.

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबAkola cityअकोला शहर