अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी सोमवारपर्यंत ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.यावर्षीच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात जिल्ह्यातील १६८ गावांमध्ये १२५ उपाययोजना प्रस्तावित आहेत. या उपाययोजनांच्या कामांसाठी २ कोटी ८६ लाख २० हजारांचा खर्चही प्रस्तावित करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी आतापर्यंत ३६ गावांमध्ये ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ९ विंधन विहिरी, १ तात्पुरती पूरक नळ योजना आणि २७ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी ३७ कामांना प्रशासकीय मंजुरी
By admin | Updated: May 27, 2014 18:49 IST