शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

५१७ शिक्षकांचे आजपासून समायोजन; २९ जानेवारीपर्यंत ठरविले वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:33 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मराठी, उर्दू शिक्षकांच्या मिळून ५१७ नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात कमालीची दिरंगाई करण्यात आली.

अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मराठी, उर्दू शिक्षकांच्या मिळून ५१७ नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात कमालीची दिरंगाई करण्यात आली. नियुक्तीसाठी शिक्षकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नियुक्ती देण्यासाठी २१ ते २९ जानेवारीपर्यंतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार समुपदेशनाने नियुक्तीला उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त असल्याने विषय शिक्षकांची नियुक्ती करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने ही पदे भरावीत, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अकोला जि.प.मध्ये विषय शिक्षकांच्या पदभरतीअभावी सहायक शिक्षक अतिरिक्त झाल्याने, त्यांना रॅन्डम राउंडमध्ये तालुका बदलून नियुक्ती दिली होती. तीन महिने उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान, गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. त्यावेळी सोमवारपासून विषय शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता होती; मात्र पंचायत समिती स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. त्यामध्ये बदली होणाºया शिक्षकांचाही सहभाग आहे. पदस्थापना प्रक्रिया राबविल्यास त्यांची बदली होईल. त्यांची शाळा बदल होईल. या काळात शालेय स्पर्धांमध्ये अडचण येण्याची शक्यता असल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता सहा दिवसांच्या कालावधीत शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना दिली जाणार आहे.- उर्दू माध्यमाचे दोन दिवसउर्दू माध्यमातील १२१ शिक्षकांचे विषयनिहाय समायोजन करण्यासाठी २१ व २२ जानेवारी असे दोन दिवस ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सामाजिकशास्त्राचे १०६, भाषा-९२, विज्ञान-१७९ एवढ्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे. त्याचवेळी रिक्त जागांची संख्या भाषा-३१, विज्ञान-५८, सामाजिकशास्त्र-२१ आहे.- मराठी माध्यमातही रिक्त जागा कमी, शिक्षक अतिरिक्तमराठी माध्यमात विज्ञान विषयाचे शिक्षक ३९६ आहेत. त्यांच्यासाठी रिक्त जागा २८७ आहेत. समाजशास्त्र विषयासाठी २९९ शिक्षक असताना त्यांच्यासाठी ५९ जागा आहेत, तर भाषा विषयाचे ५३७ शिक्षक असताना ११६ जागा रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे समुपदेशानंतर शिक्षकांवर पुन्हा एकदा अन्याय होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक